• प्राथमिक फेरी अत्यंत सरल पद्धतीने. सहभागींचे मूल्यमापन केवळ परीक्षकांद्वारे होईल.
  • |
  • अधिक माहितीसाठी संपर्क :- 7391098137 / 7887860107
  • The preliminary round is very simple. Evaluation will be done by examiners only.
  • |
  • Note: For more information, contact :- 7391098137 / 7887860107
रायसोनी करंडक

जी.एच.रायसोनी करंडक

आकडेवारी

आकडेवारी

0

आवृत्ती

0+

महाविद्यालयांचा सहभाग

0+

प्रेक्षकांचा सहभाग

0+

पुरस्कार विजेते

निकाल २०२६

निकाल २०२६

प्राथमिक फेरीचा निकाल
क्र. महाविद्यालय एकांकिका
1 मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव ‘भोरपी’
2 नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव ‘मारुतीची जत्रा’
3 केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव ‘नो सिग्नल’
4 पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (जि. नंदुरबार) मादी…
5 एम. जी. एम. कॉलेज, कॉम्प्युटर सायन्स अँड आय.टी., नांदेड गिल्टी
6 राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर ड्रायव्हर*
7 दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर कॅलिडोस्कोप
8 दयानंद विधी महाविद्यालय, लातूर लाली
9 देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर ग्वाही
10 आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर सोयरीक*
11 संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अस्तित्व
12 भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर : एक डॉट
13 शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर उन्नीस सौ नब्बे
14 एस. पी. महाविद्यालय, पुणे आतल्या गाठी
15 मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे पावसात आला कोणी
16 अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर कुठलीये बायको
17 मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे बोहाडा
18 कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर मणी वसे ते
19 ललित कला विभाग व छंद मंदिर, नागपूर ३.. २.. १.. स्टार्ट!
20 आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, नागपूर काळ भूत
21 तुळशीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर जागृती
22 वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर गोष्टीचा खेळ
23 विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर अल्पभूधारक
24 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कला सादरीकरण विभाग, छत्रपती संभाजी नगर बुजगावणं
25 श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला कोप
26 विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मुंबई भू भू
27 साठये कॉलेज अॅमिग्डाला
28 श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती ओझोन
29 विद्याभारती महाविद्यालय, अमरावती लगिन
30 प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, अमरावती अर्बन
अंतिम फेरीचा निकाल - २०२६
पुरस्कार नाव एकांकिका महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट निर्मिती
प्रथम - सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
द्वितीय - ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
तृतीय - ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
उत्तेजनार्थ प्रथम - भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
- नो सिग्नल के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
अभिनय पुरुष
प्रथम हर्षवर्धन भोसले सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
द्वितीय पार्थ पाटणे ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
तृतीय संदीप घुगरे ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
उत्तेजनार्थ शर्व कुलकर्णी पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
सारंग पाटील नो सिग्नल के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
विश्वजित कोळी भोरपी मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
अभिनय स्त्री
प्रथम अक्षता बारटक्के ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
द्वितीय गायत्री चातारकर भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
तृतीय संयोगिता चौधरी सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
उत्तेजनार्थ तनुजा शिंदे कॅलिडिओस्कोप दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर
आकांशा धंदर अर्बन प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, अमरावती
किरण कुलकर्णी भू भू विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मुंबई
दिग्दर्शन
प्रथम ऋतुजा पवार सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
द्वितीय संदीप घुगरे ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
तृतीय अनुष्का पाटील ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
उत्तेजनार्थ अमृता करोडपती नो सिग्नल के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
प्रकाशयोजना
प्रथम हिमांशू बानोले भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
द्वितीय नील भानोसे, तुकाराम लव्हरे पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
तृतीय अनुष्का पाटील ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
उत्तेजनार्थ ज्योतिबा बडे कॅलिडिओस्कोप दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर
रंगभूषा-वेशभूषा
प्रथम तनुजा शिंदे कॅलिडिओस्कोप दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर
द्वितीय श्रुती शिंदे चंद्रोदय जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हरसिटी, पुणे
तृतीय मुकुल ढेकळे बोहाडा मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे
उत्तेजनार्थ प्रणाली पाटील, अर्पिता गजगेश्वर ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
नेपथ्य
प्रथम महेश कुमार चौगुले ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
द्वितीय संकेत मते भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
तृतीय श्रावणी संजवाड चंद्रोदय जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हरसिटी, पुणे
उत्तेजनार्थ विपश्यना कामत उन्नीस सौ नब्बे शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर
संगीत
प्रथम सागर शिंदे ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
द्वितीय साक्षी चरणकर, प्रतीक भस्मे ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
तृतीय मंदार पाटील सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
उत्तेजनार्थ अभिषेक लोखंडे पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
लेखन
प्रथम श्रुती साळुंखे, अनंत हंडीफोड हाफवे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर
द्वितीय मुकुल ढेकळे बोहाडा मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे
तृतीय हर्षल बोरनारे भोरपी मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
उत्तेजनार्थ शर्व कुलकर्णी पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
विशेष उत्तेजनार्थ
उत्तेजनार्थ (सांघिक) - अर्बन प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, अमरावती
उत्तेजनार्थ (दिग्दर्शन) अथर्व देव हमको हिंदी नहीं आती संताजी महाविद्यालय, नागपूर
उत्तेजनार्थ (अभिनय स्त्री) तेजल पाटील एका रात्रीचा गर्भ दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा, जळगाव
निर्मिती गणवीर ओझोन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती
उत्तेजनार्थ (अभिनय पुरुष) प्रथमेश लाखोळे ३.. २.. १.. स्टार्ट! ललित कला विभाग व छंद मंदिर, नागपूर
प्रवेश अर्ज

प्रवेश अर्ज

जी एच रायसोनी करंडक
समिति

समिति

श्री सुनील रायसोनी

अध्यक्ष, रायसोनी एज्युकेशन

श्रीमती शोभा रायसोनी

सल्लागार, रायसोनी एज्युकेशन

डॉ. मृणाल नाईक

प्रकल्प प्रमुख

अमित गंधारे

जनसंपर्क अधिकारी, रायसोनी एज्युकेशन

शेखर नाईक

सल्लागार

शुभांगी ठाकरे

समन्वयक
पारितोषिके

पारितोषिके

अंतिम फेरीतील पुरस्कार

(निर्मिती)

  • सर्वोत्कृष्ट निर्मिती (प्रथम) -१ लक्ष ११ हजार रुपये
  • सर्वोत्कृष्ट निर्मिती (द्वितीय) - ७१ हजार रुपये
  • सर्वोत्कृष्ट निर्मिती (तृतीय) - ५१ हजार रुपये
  • सर्वोत्कृष्ट निर्मिती (उत्तेजनार्थ प्रथम) - २१ हजार रुपये
  • सर्वोत्कृष्ट निर्मिती (उत्तेजनार्थ द्वितीय) - २१ हजार रुपये

परीक्षकांची विशेष निवड पारितोषिके (उत्तेजनार्थ)

  • प्रथम - 1 हजार रुपये
  • द्वितीय - 1 हजार रुपये
  • तृतीय - 1 हजार रुपये

सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री

  • प्रथम- ५ हजार रुपये
  • द्वितीय- ३ हजार रुपये
  • तृतीय - २ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये

सर्वोत्कृष्ट अभिनय पूरुष

  • प्रथम- ५ हजार रुपये
  • द्वितीय- ३ हजार रुपये
  • तृतीय - २ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

  • प्रथम- ५ हजार रुपये
  • द्वितीय- ३ हजार रुपये
  • तृतीय - २ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ – १ हजार रुपये

सर्वोत्कृष्ट
प्रकाशयोजना

  • प्रथम- ५ हजार रुपये
  • द्वितीय- ३ हजार रुपये
  • तृतीय - २ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ – १ हजार रुपये

सर्वोत्कृष्ट रंगभूषा व सर्वोत्कृष्ट वेशभूषा

  • प्रथम- ५ हजार रुपये
  • द्वितीय- ३ हजार रुपये
  • तृतीय - २ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ – १ हजार रुपये

विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके

  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये

सर्वोत्कृष्ट नेपथ्य

  • प्रथम- ५ हजार रुपये
  • द्वितीय- ३ हजार रुपये
  • तृतीय - २ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ – १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये

सर्वोत्कृष्ट संगीत

  • प्रथम- ५ हजार रुपये
  • द्वितीय- ३ हजार रुपये
  • तृतीय - २ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - १ हजार रुपये
  • उत्तेजनार्थ – १ हजार रुपये

सर्वोत्कृष्ट लेखक

  • प्रथम - 5 हजार रुपये
  • द्वितीय - 3 हजार रुपये
  • तृतीय - 2 हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - 1 हजार रुपये
  • उत्तेजनार्थ - 1 हजार रुपये
करंडक नियमावली - २०२७

जी एच रायसोनी करंडक नियमावली - २०२७

  • 1. जी एच रायसोनी करंडक ही मराठी एकांकिका स्पर्धाअसनू केवळ महाविद्यालयीन रंगकर्मींकरिता आयोजित करण्यात येईल. स्पर्धाप्राथमिक फेरी आणि अतिंम फेरी अशा दोन टप्प्यांत पार पडते.

  • 2. प्राथमिक फेरी तालीम स्वरूपात घेतली जाईल. परीक्षक अंतिम फेरीसाठी संघांची निवड करतील. प्राथमिक फेरीसाठी कोणत्या प्रकारच्या विशिष्ट तयारीची गरज नसून, ती साधारण लाईट्स आणि साऊंड मधेच घेतली जाईल. प्रत्येक संघाने स्वतःचे छोटे स्पिकर्स आणणे अपेक्षित आहे.

  • 3. प्राथमिक फेरीचे वेळापत्रक आयोजकांकडून फोनद्वारे व संकेतस्थळावर कळविण्यात येईल. प्रत्येक केंद्रावरून ५ संघ अंतिम फेरीसाठी निवडले जातील.

  • 4. प्राथमिक फेरीतील सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय अंतिम फेरीत प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही.

  • 5. प्राथमिक फेरीतील सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देण्यात येईल.

  • 6. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ₹१,१००/- असून ते QR कोड किंवा बँक हस्तांतरणाद्वारे भरता येईल.

  • 7. प्रवेश अर्ज www.ghraisonikarandak.com या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. प्रवेश निश्चितीची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२६ आहे.

  • 8. अंतिम फेरी १, २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०२७ रोजी सायंटिफिक सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात येईल.

  • 9. अंतिम फेरीतील सादरीकरणाचा क्रम लकी ड्रॉद्वारे निश्चित केला जाईल. प्रत्येक संघास एकूण ६० मिनिटे (मांडणी, प्रकाश, ध्वनी, सादरीकरण व सेट क्लिअर) दिली जातील. वेळेचे उल्लंघन केल्यास संघ बाद केला जाईल.

  • 10. प्राथमिक आणि अंतिम फेरीसाठी संहितेच्या 3 प्रती, लेखकाचे परवानगीपत्र, DRM पत्र व कलावंत व तंत्रज्ञांची यादी सादर करणे बंधनकारक आहे.

  • 11. अंतिम फेरीसाठी, प्राचार्यांचे पत्र (लेटरहेडवर) टीम यादी आवश्यक आहे. महाविद्यालयाचे ओळखपत्र, प्रवेश पावती तसेच सर्व सहभागींकडे आधारकार्ड असणे बंधनकारक आहे.

  • 12. प्राथमिक व अंतिम दोन्ही फेरीमध्ये सर्व संघांनी २ तास आधी रिपोर्टींग करणे अनिवार्य आहे.

  • 13. "स्पर्धकांसाठी वयोमर्यादा इयत्ता ११वीपासून ते ३२ वर्षांपर्यंत आहे."

  • 14. दिग्दर्शक व तांत्रिक टीम महाविद्यालयातील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. प्राथमिक फेरीतील कलावंत अंतिम फेरीत बदलता येणार नाहीत. एका महाविद्यालयातून २ संघ सहभाग घेऊ शकतात.

  • 15. अंतिम फेरीसाठी आयोजकांकडून निवास, भोजन व स्थानिक प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल.

  • 16. नागपूर बाहेरील निवडलेल्या संघांना मर्यादित प्रवास भत्ता देण्यात येईल; उर्वरित खर्च संबंधित संघांनी स्वतः करावयाचा आहे.

  • 17. अंतिम फेरीत आयोजकांकडून खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील:
    PAR Lights – १० नग, Spot Lights – १६ नग, Light Controller – १ नग, Power Packs – ३ नग, मोढे– ५ नग, लेव्हल (९ इंच – ३ × ६) – ५ नग, लेव्हल (१८ इंच / ½ फूट) – ५ नग. दाराची फ्रेम (लोखंडी स्टँडी फ्रेम) – २, छोटी अलमारी – १, सोफा – १, बेड (लोखंडी) – २, टेबल (लाकडी) – २, टीपॉय (लाकडी) – १, प्लास्टिक खुर्च्या – आवश्यकतेनुसार , डेस्कटॉप पीसी – १, डेस्क-बेंच – आवश्यकतेनुसार , कठघरा – १, पांढरा पडदा (पांढरी बेडशीट) – १, गॅस शेगडी – १, वृंदावन – १.

  • 18. अतिरिक्त साहित्य आवश्यक असल्यास किमान १५ दिवस आधी कळवावे व त्यासाठी शुल्क आकारले जाईल.

  • 19. स्टेज सेटअपदरम्यान विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही स्टेज किंवा बॅकस्टेजवर प्रवेश दिला जाणार नाही. लाईट्स अॅडजस्टमेंट व नेपथ्य मांडणी ही कामे संघातील विद्यार्थ्यांनीच करणे बंधनकारक आहे.

  • 20. स्पर्धेत केवळ मराठी एकांकिका सादर करता येतील. एकांकिकेत नग्नता, बीभत्सता, जातीय किंवा धार्मिक टिप्पणी तसेच गोपनीयतेचेउल्लंघन असूनये.

  • 21. स्पर्धास्थळी तंबाखूव मद्यपदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे.

  • 22. लेखनाच्या पारितोषिकासाठी मूळ संहितांचा विचार केला जाईल. अनुवादित, भाषांतरित, रूपांतरित अथवा आधारित संहितांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. अशा संहितांसाठी मूळ लेखक/प्रकाशक/वारसांची परवानगी घेणे संबंधित संघाची जबाबदारी राहील.

  • 23. स्पर्धेत सादर करण्यात येणाऱ्या एकांकिकेचे सर्व प्रसारण, हक्क आयोजकांकडे राखीव राहतील. यामध्ये यूट्यूब, इन्स्टाग्राम तसेच इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रसारणाचा समावेश असेल.

  • 24. कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा नियमबाह्य कृत्य आढळल्यास संबंधित संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

  • 25. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. तसेच नियम व वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडेराहील.

  • 26. कोणतीही शंका असल्यास वेळेत आयोजकांशी संपर्क साधावा.

  • 27. प्रत्येक संघाने आपल्या साहित्याची, बॅग्सची व इतर वस्तूंची जबाबदारी स्वतः घ्यावी. कोणतीही वस्तू हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.

  • 28. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रकृतीनुसार आवश्यक असलेली औषधे (Medicines) सोबत बाळगावीत.

  • 29. वसतिगृह कर्मचारी (Hostel Staff) तसेच वाहन कर्मचारी (Vehicle Coordinator ) यांच्याशी योग्य समन्वय व शिस्तबद्ध वर्तन राखावे.

  • 30. कोणत्याही कर्मचारी, स्पर्धक किंवा आयोजकांशी गैरवर्तन, वाद किंवा अनुचित वर्तन करू नये.

  • 31. अंतिम फेरीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण, समस्या किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित आयोजकांशी संपर्क साधावा.
लेखकाची परवानगी

लेखकाची परवानगी

वृत्त

वृत्त

रायसोनी करंडक

जी.एच.रायसोनी करंडक २०२७

प्रशंसापत्र

प्रशंसापत्र

जी एच रायसोनी राज्यस्तरीय अंतिम फेरी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा , नागपूर - २०२३

उत्सव नाट्याचा, जागर रंगदेवतेचा....!
नवलाई नवंतारुण्याची , उधळण पुरस्काराची...!!

नागपूर येथील रायसोनी ग्रुप परिसरात संस्थेचे सर्वेसर्वा श्री. सुनीलजी रायसोनी यांच्या कुशल मार्गदर्शनात दि. ४- ५ मार्च रोजी सदर स्पर्धेचे अत्यंत देखणे व सर्वांग सुंदर आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेचा परीक्षक म्हणून मला उपस्थित राहण्याचा योग आला. माझ्या सोबत नरेंद्र आमले ( पिंपरी चिंचवड) आणि रुपाली मोरे - कोंडेवार( नागपूर) हे दोघे सहकारी परीक्षक होते. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून देखील...

स्पर्धेत , अंतिम फेरीसाठी राज्यभरातून एकूण पंधरा एकांकिका सादर करण्यात आल्या होत्या.. रायसोनी ग्रुपच्या इव्हेंट कॉर्डिनेटर डॉ. मृणाल नाईक यांच्या नेतृत्वात तथा प्रसिध्द पत्रकार व लेखक नितीन नायगावकर व ज्येष्ठ रंगकर्मी वैदेही चवरे सोईतकर यांच्या भरीव सहकार्याने स्पर्धा एकदम झकास पार पडली. ' चला हवा येऊ द्या ' फेम प्रसिध्द कलावंत भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या तोऱ्यात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. गणेशपुरे यांच्या प्रकट मुलाखतीचे सोहळ्याला ' चार चाँद लागले '.

आखीव रेखीव , नीटनेटक्या संयोजनामुळे, ही स्पर्धा वर्षागणिक अधिकाधिक नावाजत जाईल आणि स्पर्धक संस्था दर वर्षी ह्या स्पर्धेची नक्कीच वाट पाहतील, ह्या स्पर्धेला एक समृध्द स्पर्धा म्हणून ओळखले जाईल , यात तीळमात्रही शंका नाही....!

ह्या स्पर्धेला भावी वाटचालीस साठी माझ्या हार्दिक शुभेच्छा...!!!

मा. श्री. मधू जाधव

ज्येष्ठ रंगकर्मी

संपर्क

संपर्क

Cookies Consent

This website use cookies to help you have a superior and more relevant browsing experience on the website.