आवृत्ती
महाविद्यालयांचा सहभाग
प्रेक्षकांचा सहभाग
पुरस्कार विजेते
| क्र. | महाविद्यालय | एकांकिका |
|---|---|---|
| 1 | मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव | ‘भोरपी’ |
| 2 | नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव | ‘मारुतीची जत्रा’ |
| 3 | केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव | ‘नो सिग्नल’ |
| 4 | पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (जि. नंदुरबार) | मादी… |
| 5 | एम. जी. एम. कॉलेज, कॉम्प्युटर सायन्स अँड आय.टी., नांदेड | गिल्टी |
| 6 | राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर | ड्रायव्हर* |
| 7 | दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर | कॅलिडोस्कोप |
| 8 | दयानंद विधी महाविद्यालय, लातूर | लाली |
| 9 | देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर | ग्वाही |
| 10 | आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर | सोयरीक* |
| 11 | संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | अस्तित्व |
| 12 | भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर | : एक डॉट |
| 13 | शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर | उन्नीस सौ नब्बे |
| 14 | एस. पी. महाविद्यालय, पुणे | आतल्या गाठी |
| 15 | मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे | पावसात आला कोणी |
| 16 | अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर | कुठलीये बायको |
| 17 | मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे | बोहाडा |
| 18 | कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर | मणी वसे ते |
| 19 | ललित कला विभाग व छंद मंदिर, नागपूर | ३.. २.. १.. स्टार्ट! |
| 20 | आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, नागपूर | काळ भूत |
| 21 | तुळशीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर | जागृती |
| 22 | वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर | गोष्टीचा खेळ |
| 23 | विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर | अल्पभूधारक |
| 24 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कला सादरीकरण विभाग, छत्रपती संभाजी नगर | बुजगावणं |
| 25 | श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला | कोप |
| 26 | विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मुंबई | भू भू |
| 27 | साठये कॉलेज | अॅमिग्डाला |
| 28 | श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती | ओझोन |
| 29 | विद्याभारती महाविद्यालय, अमरावती | लगिन |
| 30 | प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, अमरावती | अर्बन |
प्रति,
संयोजक
जी.एच. रायसोनी करंडक
नागपूर
जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत आमच्या महाविद्यालयाचा संघ सहभागी होत आहे. सर्व कलावंत सद्यस्थितीत आमच्या महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. लेखक, दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञांची नावे सोबत दिलेली आहेत. प्रयोगाचे चित्रीकरण करण्यास व कुठल्याही माध्यमावर प्रसारण करण्यास आमची कुठलीही हरकत नसणार आहे. स्पर्धेच्या सर्व अटी आम्ही वाचल्या आहेत आणि त्या आम्हाला मान्य आहेत. परीक्षकांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल.
| Entity name / घटकाचे नाव | Bank Name / बँकेचे नाव | Account No. / खाते क्रमांक | IFSC Code / IFSC कोड |
|---|---|---|---|
| G H RAISONI SPORTS & CULTURAL FOUNDATION | ICICI BANK RAMDASPETH BRANCH | 624205012909 | ICIC0006242 |
जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीनं फेब्रुवारी- २०२५ मध्ये तिसऱ्या जी एच रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातील संघांनी यात सहभाग घेतला आणि महाअंतिम फेरी नागपूर येथे थाटात पार पडली. आता स्पर्धेचा प्रवास समृद्ध करण्यासाठी आणखी एक पुढचं पाऊल आम्ही टाकत आहोत. पुढील वर्षी रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी १, २, ३ आणि ४ फेब्रुवारी, २०२६ ला नागपूर येथे होणार आहे. त्यासाठी प्राथमिक फेरी तालीम स्वरूपात होणार आहे. यातून सर्वोत्तम एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड होईल. प्राथमिक फेरी कधी होणार, मुदत काय असेल, प्रक्रिया काय असेल…
या आणि स्पर्धेसंदर्भातील इतर सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला वेळोवेळी मिळतीलच. तोपर्यंत कायम ठेवा…
जल्लोष रंगभूमीचा !
नागपूर येथील रायसोनी ग्रुप परिसरात संस्थेचे सर्वेसर्वा श्री. सुनीलजी रायसोनी यांच्या कुशल मार्गदर्शनात दि. ४- ५ मार्च रोजी सदर स्पर्धेचे अत्यंत देखणे व सर्वांग सुंदर आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेचा परीक्षक म्हणून मला उपस्थित राहण्याचा योग आला. माझ्या सोबत नरेंद्र आमले ( पिंपरी चिंचवड) आणि रुपाली मोरे - कोंडेवार( नागपूर) हे दोघे सहकारी परीक्षक होते. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून देखील...
स्पर्धेत , अंतिम फेरीसाठी राज्यभरातून एकूण पंधरा एकांकिका सादर करण्यात आल्या होत्या.. रायसोनी ग्रुपच्या इव्हेंट कॉर्डिनेटर डॉ. मृणाल नाईक यांच्या नेतृत्वात तथा प्रसिध्द पत्रकार व लेखक नितीन नायगावकर व ज्येष्ठ रंगकर्मी वैदेही चवरे सोईतकर यांच्या भरीव सहकार्याने स्पर्धा एकदम झकास पार पडली. ' चला हवा येऊ द्या ' फेम प्रसिध्द कलावंत भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या तोऱ्यात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. गणेशपुरे यांच्या प्रकट मुलाखतीचे सोहळ्याला ' चार चाँद लागले '.
आखीव रेखीव , नीटनेटक्या संयोजनामुळे, ही स्पर्धा वर्षागणिक अधिकाधिक नावाजत जाईल आणि स्पर्धक संस्था दर वर्षी ह्या स्पर्धेची नक्कीच वाट पाहतील, ह्या स्पर्धेला एक समृध्द स्पर्धा म्हणून ओळखले जाईल , यात तीळमात्रही शंका नाही....!
ह्या स्पर्धेला भावी वाटचालीस साठी माझ्या हार्दिक शुभेच्छा...!!!
This website use cookies to help you have a superior and more relevant browsing experience on the website.
कॉपीराइट © २०२६ सर्व अधिकार राखीव आहेत. डिझाइन द्वारे विकसित ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड.